भारत २१ व्या शतकातील “ज्ञानाची महाशक्ति” बनण्याचा प्रयत्त्न करत आहे. या द्रुष्टीने शिक्षण क्ष्रेत्राची जबाबदारी वाढली आहे. २१ व्या शतकासाठी सक्षम भारतीय तयार करण्याचे आव्हान शिक्षण क्षेत्रासमोर आहे. शालेय शिक्षणाचे चित्र बदलण्याची गरज स्पष्ट दिसत आहे. म्हणूनच या काळात प्राचीन व अर्वाचीन भारतीय शिक्षण प्रणालीचे व शिक्षण क्षेत्रात झालेल्या प्रयोगांचे सिंहावलोकन करणे आवश्यक ठरते. २०१९ चे नवीन शैक्षणिक धोरणाचा पूर्णतः अवलंब नजीकच्या काळात होईल. अशा या संधिकाळात अर्वाचीन भारतीय शिक्षण प्रणालीचा दुवा २१ व्या शतकातील शिक्षण प्रणालीशी जोडण्याचे कार्य प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून होईल असा विश्वास आहे.
शिक्षण प्रणालीत काळाप्रमाणे बदल करणे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यशस्वी करणे, आणि भारताला ज्ञानाची महाशक्ती बनविणे शिक्षकांवर अवलंबून आहे. यासाठी शिक्षकाने सातत्याने व्यवसाय वृद्धी करणे जसे गरजेचे आहे तसेच सर्जनशील व प्रयोगशील राहून नवे मार्ग शोधणे आवश्यक आहे. यातील काही नव्या मार्गाची नांदी या पुस्तकातून वाचकांना मिळेल अशी आशा आहे. हे पुस्तक शिक्षण क्षेत्रात प्रवेश करणारे विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रात अनेक वर्ष काम करणारे शिक्षक व शिक्षणात रस असणाऱ्या सर्वांना उपयुक्त होईल.
अनुक्रमणिका –
१. बदलाची नांदी
२. शैक्षणिक धोरणाचे वैचारिक अधिष्ठान
३. अनुभवजन्य शिक्षण: नवे दालन
४. समुदाय शिक्षण: काळाची गरज
५. कला समावेशित आनंददायी शिक्षण
६. व्यवसाय शिक्षणाची पायाभरणी
७. शारीरिक शिक्षणाचे नवे रूप
८. सर्वकष व शाश्वत शिक्षणाकडे वाटचाल
९. संदर्भसूची