Biography

Ashlesha Anil Kulkarni

डॉ. अश्लेषा कुलकर्णी उदयोन्मुख अर्थतज्ज्ञ आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका आहेत. विद्यार्थी दशेत सातत्याने नेत्रदीपक यश मिळवत त्यांनी गुणवत्ता यादीतील प्रथम क्रमांक सुवर्ण पदकासह कायम राखला. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय चर्चासत्रे आणि परिषदांमध्ये त्यांनी 45 शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांनी 12 संस्कृत एकांकिकांचे आणि 6 मराठी एकांकिकांचे लेखन केले आहे. उत्तराखंड संस्कृत विद्यापीठातर्फे नाट्îलेखनाचे राष्ट्रीय पारितोषिक आणि ‘वारसा’ या एकांकिकेच्या लेखनासाठी मराठी नाट्यपरिषदेच्या पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. अर्थशास्त्रातील सर्वोत्कृष्ट शोधनिबंधाचा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. आविष्कार या महाराष्ट्र शासनाच्या संशोधन स्पर्धेत पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतांना वैयक्तिक पारितोषिकासह त्यांनी पुणे विद्यापीठाला प्रावीण्य करंडक जिंकून दिला. वक्तृत्व, निबंध, कथाकथन, वादविवाद, पुष्परचना, नाट्य, पथनाट्य स्पर्धांमध्ये त्यांना 398 पारितोषिके मिळाली आहेत. नाशिक आकाशवाणीवर त्यांच्या इको बेसिक्स, जगण्याचे आधुनिक अर्थविज्ञान, पर्यावरणीय अर्थशास्त्र, चर्चेतील अर्थाक्षरे या मालिका प्रसारित झाल्या आहेत. या मालिकांतून त्यांनी अर्थसाक्षरतेचा प्रसार केला आहे. नाशिक आकाशवाणीवर इकॉनॉमिक सव्र्हे, किसान सन्मान योजना, उज्वला योजना, बजेट यांसारख्या आर्थिक विषयांवर अनेक मुलाखती प्रसारित झाल्या आहेत. स्पेक्ट्रम, दृष्टिकोन, दखल, सखी या कार्यक्रमांमध्ये विशेष निमंत्रित म्हणून त्यांनी सहभाग नोंदवला आहे. स्वामी विवेकानंद युवा गौरव पुरस्कार, यंग लेडी इकॉनॉमिस्ट अवॉर्ड आणि लोककवी वामनदादा कर्डक पुरस्काराने त्या सन्मानित आहेत.