Biography
Dr. Rajashree Joshi
डॉ. राजश्री मिलिंद जोशी या सेवा सदन्स कॉलेज ऑफ एज्युकेशन, उल्हासनगर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून सेवारत आहेत. त्या विद्यावाचस्पती (शिक्षणशास्त्र), अधिस्नातक (मराठी साहित्य), अधिस्नातक (मानसशात्र), अधिस्नातक (शिक्षणशास्त्र) पदवीधर आहेत तसेच राज्यस्तर पात्रता परीक्षा उत्तीर्ण व शालेय व्यवस्थापक पदविकाधारक आहेत. त्यांना शालेय विद्यार्थ्यांना व महाविद्यालयीन शिक्षणशास्त्र विद्यार्थ्यांना शिकविण्याचा व मार्गदर्शन करण्याचा अनुभव आहे. या क्षेत्रात त्या २९ वर्षे कार्यरत आहेत. महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर अनेक समितींमध्ये त्या काम करत आहेत. त्या अभ्यासक्रम पुनर्निर्माण समितीच्या सदस्या आहेत. अ-मराठी भाषिक शिक्षकांना मराठी शिकविण्यासाठी मुंबई विद्यापीठातील जर्मन विभागाने तयार केलेल्या अभ्यासक्रमाच्या कार्यात त्यांनी सहकार्य केले आहे. शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या उप-समितीच्या त्या निमंत्रक होत्या. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये त्यांनी अनेक संशोधात्मक लेख सादर केले आहेत. त्यांचे अनेक लेख शिक्षणशास्त्र विषयांच्या मासिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्या इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या मानसशास्त्र विषयाच्या महाविद्यालयस्तरावर सहाय्यक समन्वयक आहेत. तसेच इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ (दिल्ली), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (नाशिक), दूरस्थ व मुक्त शिक्षण संस्था मुंबई साठी समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षक व पालकांसाठी त्या प्रशिक्षण सत्र आयोजित करतात.