Biography

Ketaki Satpute

डॉक्टर केतकी सातपुते या श्री नारायण गुरु कॉलेज ऑफ एज्युकेशन, चेंबूर, मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्या एम. कॉम. (हिंदी), एम.एड., सेट व नेट तसेच पीएच.डी. (शिक्षणशास्त्र) असून त्यांना शिक्षण क्षेत्रात शिकविण्याचा बारा वर्षाचा अनुभव आहे. मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या अध्यापन सामग्रीचे लेखन व भाषांतर त्यांनी केले आहे. शांतता शिक्षण, अनुभवधिष्टित शिक्षण या विषयांसाठी अनेकवेळा अल्पवेळ अभ्यासक्रमाच्या समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये विविध विषयांवर अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्या ओडिसी शास्त्रीय नृत्यांगना आहेत. महाराष्ट्र दर्शन या प्रा. वसंत बापट यांच्या नृत्य नाटकांमध्ये लोकनृत्यातही त्यांचा सहभाग होता.