Biography

Prof. Dr. Mrs Minal Oak

प्रा. (डॉ.) सौ. मीनल ओक - एस एल ए, अमेरिका च्या संचालक (२०२५-२०२७) आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्रंथालय शास्त्रामध्ये कार्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने "उत्कृष्ठ ग्रंथपाल" म्हणून २०२१-२२ मध्ये सन्मानित केलेल्या, २९ वर्ष प्रोफेसर (ग्रंथपाल-स्तर १४) म्हणून एम इ एस आय एम सी सी (MES IMCC) ह्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित व्यवस्थापन संस्थेमध्ये कार्यरत, अग्रगणी लेखक आणि संशोधक, आंतरविद्याशाखेमध्ये ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयाच्या संशोधन मार्गदर्शक, अग्रगणी लेखक, संशोधक आणि अध्यापक २८ वर्षे ग्रंथालय शास्त्र उपक्रमांचे (बी. लिब., एम. लिब.) अध्यापन, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्रकाशनाद्वारे ५ ग्रंथ आणि ३५ संशोधन लेखांचे लिखाण. इग्नू अभ्यासकेंद्राचे ९ वर्ष (२०१५-२०२४) धडाडीने प्रशासकीय आणि शैक्षणिक समन्वयन; भारतीय शिक्षण मंडळाच्या सदस्य, विद्यापीठ अनुदानित ग्रंथालयीन सेवा गुणवत्ता, ग्रंथालयीन सेवेचे मोजमाप संशोधन प्रकल्प, कॉलेज लायब्ररीज (WBCLA Bharat) च्या मानद समीक्षक, जर्नल ऑफ़ लाइब्ररी मैनेजमेंट (MANLIBNET India) च्या सहाय्यक संपादक म्हणून कार्यरत; आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवरील ग्रंथालयीन संस्थांकडून (SLA USA, SLA ASIA, ASIALA) तसेच विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधून ८० पेक्षा अधिक सत्रे, अमेरिकेच्या SLA "माहिती प्रशासक नेतृत्व-२०२२", मनालीबनेट इंडिया-इनोव्हेटिव्ह लाइब्रेरियन पारितोषिक २०२३, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार अनुक्रमे एम.इ. एस २०१४, रोटरी क्लब पुणे २०१६, लेक्सिकोन २०२१ ह्या संस्थांकडून, तसेच मराठबोली पुणे साहित्य सेवा पुरस्कार प्राप्त झाले आहेत.