Biography

Sunita Magare

डॉक्टर सुनिता मगरे या एमएससी (झूओलॉजी), एम.एड., तसेच पीएच.डी. (शिक्षणशास्त्र) असून मुंबई विद्यापीठात शिक्षणशास्त्र विभागात प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. मुंबई विद्यापीठात अनेक महत्त्वाच्या पदांवर व विभागांवर त्यांनी आपल्या कामाच्या शैलीची छाप उमटवली आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात शिकविण्याचा तसेच एमफील, पीएच.डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा पंचवीस वर्षाचा अनुभव आहे. टीईटी परीक्षा मार्गदर्शक, प्रकल्प आधारित कृती, माहिती संप्रेषण व शैक्षणिक संपादन, शांतताशिक्षण या विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये विविध विषयांवर अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. अनेक मुक्त विद्यापीठाच्या अध्यापन सामग्रीचे लेखन त्यांनी केले आहे. भारतात झालेल्या जागतिक शैक्षणिक अधिवेशनात त्यांना प्रा. इंदिरा पारीख पारितोषिकाने सन्मानित केले आहेत