विद्यापीठ अनुदान मंडळाने (UCG ) दिलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे सर्व विद्यापीठातील अभ्यास मंडळाने विषयांच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली आहे. नागपुर विद्यापीठातील समाजशास्त्र अभ्यास मंडळाने बी. ए. भाग २ साठी “आदिवासी समाजाचे समाजशास्त्र” ह्या प्रश्नपत्रिकेची निवड केली आहे. पूर्वीच्या सामाजिक मानवशास्त्र विषयात काही बदल करण्यात आले आहेत.
नविन अभ्यासक्रमात भारतातील जमातीचे अध्ययन हे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. त्याच बरोबर त्या प्रदेशात (विदर्भ) उदा. गोंड, कोलाम, कोरकू, बंजारा जमातीच्या अध्ययनास अधोरेखित केले आहे.
प्रस्तुत अभ्यासक्रम आणि दृष्टिकोणास आधारभूत मानून “आदिवासी समाजाचे समाजशास्त्र” ह्या पुस्तकाची मांडणी केली आहे. प्रत्येक प्रकारणाचे शेवटी मुख्य प्रश्नांचा निर्देश केला आहे. ह्या पुस्तकाचा उपयोग MPSC, UPSC तसेच SET आणि NET परीक्षेसाठी सुधा होणार आहे. नागपूर विद्यापीठ व अमरावती विद्यापीठा समवेत महाराष्ट्रातील इतर विद्यापीठातील विद्यार्थी आणि जिज्ञासु अभ्यासकांना तसेच संशोधकांना हे पुस्तक, उपयुक्त आहे.
अनुक्रमाणिका –
१. आदिवासी समाज
२. कुटुंब
३. कुलसंघटन
४. देवकवाद
५. विवाह
६. स्रियांचा दर्जा आणि भूमिका
७. शयनगृह व्यवस्था
८. जामतीचे आर्थिक जीवन
९. जामतीचा धर्म
१०. जमातीतील राजकीय संघटन
११. भारतातील जमातींच्या समस्या आणि जामतीचे कल्याण
१२. जामतीचे सामाजिक संघटन आणि समस्या
१३. वंश
संदर्भग्रंथ