अर्थशास्त्र हा विषय समाजविज्ञान शाखेतील एक महत्वाचा परंतु समजण्यास कठिण असा विषय समजला जातो. विद्यार्थ्यांची ही प्रमुख अडचण लक्षात घेऊन या विषयातील विविध संकल्पना, सिद्धांत, व्याख्या, उदाहरणे, आकृत्या इत्यादिंचे सहज आकलन व्हावे म्हणून अत्यंत सोप्या, सुलभ भाषेत व मुद्देसूद पद्धतीने मांडणी केली आहे. अर्थशास्त्रातील काही संकल्पना विविध नावांनी ओळखल्या जातात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होवू नये म्हणून पर्यायी नावेही दिलेली आहेत. प्रत्येक ठिकाणी शिर्षकांना इंग्रजीतील प्रतिशब्दही दिलेले आहेत. नविन अभ्यासक्रमातील प्रत्येक भाग प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे.
नागपूर विद्यापीठाने शैक्षणीक सत्र २०१६-१७ पासून सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यानुसार बी. ए. भाग – १ च्या सत्र – १ ‘सूक्ष्म अर्थशास्त्र’ हे पुस्तक विद्यार्थी व प्राध्यापकांना सादर करतांना आनंद होत आहे.
प्रस्तुत पुस्तक नागपूर, गोंडवाना, अमरावती विद्यापीठांच्या बी. ए. सत्र – १ च्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असा विश्वास आहे.
अनुक्रमणिका –
युनिट १ – अर्थशास्त्राची ओळख
१. अर्थशास्त्राच्या व्याख्या, स्वरूप व व्याप्ती
२. आगमन व निगमन पद्धती
३. सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्र
४. आर्थिक नियम
५. मूलभूत आर्थिक समस्या
युनिट २ – मागणी नियम व पुरवठा नियम
६. मागणीचा नियम
७. मागणीची लवचिकता
८. पुरवठयाचा नियम
युनिट ३ – उपभोक्त्याची वर्तणूक
९. उपयोगिता विश्लेषण
१०. तटस्थता वक्र विश्लेषण
११. उपभोक्त्याचे संतोषाधिक्य आणि एंजेल वक्र
युनिट ४ – उत्पादन फलन
१२. उत्पादन आणि उत्पादनाचे घटक
१३. उत्पादन फलन व उत्पादन फलाचे नियम
१४. सम – उत्पत्ती वक्र
१५. उत्पादन मान अंतर्गत व बाह्य बचती आणि अबचती
वस्तुनिष्ठ प्रश्न