१८७१ च्या गुन्हेगार जमाती कायद्याने भारतातील १९८ जमातींना जन्मतः गुन्हेगार घोषित केले होते. या जमातींवर आत्मचरित्रपर, कथा, कादंबरी आणि सिनेमा या माध्यमातुन प्रकाशन झाले असले तरी, त्यांच्या सामाजिक व आर्थिक विषयावर सैद्धांतीक संशोधन अपवादात्मक आढळते अथवा अपुरे आहे. म्हणून याविषयीचे संशोधन कथा, कादंबरी इ. शिवाय समाजासमोर यावे या हेतूने पुस्तक प्रकाशित करण्याचा मानस आहे. हे संशोधन भटक्या जमातीच्या विशेषतः पूर्व घोषित गुन्हेगार जमातींच्या विकासासाठी आणि त्यांच्या पुढील संशोधनासाठी उपयुक्त ठरणार आहे.
पूर्व घोषीत गुन्हेगार जमातीमध्ये जे पारंपरिक कला कौशल्य आहेत परंतु केवळ ऐतिहासिक चुकीने त्यांच्याकडे जे नियोजनात दुर्लक्ष झाले आहे आणि गुन्हेगारीचा कलंक लागल्याने त्या मागास राहील्या हे प्रामाणिक कारण पुस्तक लिहिण्यापाठीमागे आहे.
अनुक्रमाणिका –
१. नोमॅड (भटके), ट्राईब (जमात) आणि जात संकल्पना
२. भटक्या जमातींची जागतिक पार्श्वभूमी : इतिहास, संस्कृती व जीवनमान
३. जगातील व भारतीय भटके लोक आणि गुन्हेगारीच्या संबंधांविषयी तज्ञांचे निष्कर्ष
४. गुन्हेगारी वर्तवणुकीचे स्वरुप आणि कायदे
५. भारतीय गुन्हेगारी जमाती कायद्याची सामाजिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी : चिकित्सक मिमांसा
६. भारतातील पूर्व गुन्हेगार जमातींची राज्यनिहाय लोकसंख्या
संदर्भ सूची