“समावेशीत शाळेची निर्मिती” हे पुस्तक मुंबई विद्यापीठाच्या बी.एड. श्रेयांक आधारित निवड पद्धतीनुसार आलेल्या आंतरशाखीय अभ्यासक्रम (चौथा) वर आधारित आहे. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी करावयाच्या समावेशनाची सैद्धांतिक व धोरणात्मक बाजू, या विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये व त्यांना शिकविण्याच्या कार्यनीती, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय धोरणे, सवलती यांची माहिती दिली आहे. या पुस्तकांमध्ये समावेशक वर्गात अध्यापन करताना शिक्षकांना येणाऱ्या समस्या, त्यावरील उपाययोजना, आय सी टी चा उपयोग या सारख्या मुद्यांचा समावेश केला आहे. त्याच प्रमाणे या विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनात विविध वाहिन्यांचे योगदान व भूमिका या विषयी चर्चा केली आहे.
Contents –
१. समावेशनाकडे वाटचाल
२. समावेशनाचे संवर्धन
३. शिक्षण क्षेत्रातील समावेशन
४. समावेशक शाळा
५. समावेशकतेनुसार अभ्यासक्रमाचे नियोजन
६. शालेय वर्गातील समावेशन
७. समावेशक शिक्षणात सहाय्यक सेवा
संदर्भ ग्रंथ सूची