Biography

Dr. Subhash Aathawle

डॉ सुभाष आठवले - श्रीमती चांदिबाई हिम्मथमल मनसुखानी महाविद्यालयाचे गेली २७ वर्ष ग्रंथपाल, ग्रंथपालनाबरोबरच प्रशासकीय कार्यामध्ये निष्णात असलेले डॉ. सुभाष आठवले गेली ३४ वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या प्रशासकीय अनुभवामध्ये प्रामुख्याने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पंचवार्षिक योजनेची महाविद्यालयीन पातळीवरील अंमलबजावणी, विविध विद्याशाखांतर्गत महाविद्यालयांच्या उभारणी आणि स्थापनेमध्ये बजावलेली अग्रणी भूमिका यांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त महाराष्ट्र विद्यापीठ कायदा संशोधन मसूदा समिति सदस्यत्व, ग्रंथ निवड समितिमध्ये शासन नामनिर्देशित सदस्यत्व अशा भूमिका देखील त्यांनी बजावलेल्या आहेत. विद्यापीठातील व विद्यापीठ अनुदान आयोगाचे ग्रंथालय विषयावरील किरकोळ संशोधन प्रकल्प त्यांनी केले आहेत. मुंबई विद्यापीठामध्ये सिनेट सदस्य, विद्यापीठ निवड समित्यांमध्ये तसेच विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समिति सदस्य म्हणूनही कार्य केले आहे. त्यांना राजीव गांधी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, तसेच उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कारानी सम्मानित केले आहे.