इतिहास लेखन हा ज्ञानव्यवहारातला कायमचा चर्चा विषय राहिलेला आहे. इतिहासाचा हा प्रांत म्हणजे अनेक समज व गैरसमज रूढ करणारा असला तरी तो तेवढाच जिव्हाळ्याचा सुद्धा आहे. इतिहासाबद्दल असणाऱ्या ह्याच जिव्हाळ्यापायी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित बी. ए. प्रथम सत्र ‘भारताचा इतिहास (प्रारंभ ते १५२५)’ या ग्रंथाने आकार घेतला.
प्रस्तुत ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर व महाराष्ट्रातील अन्य विद्यापीठातील विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल. ग्रंथाची शब्दरचना अतिशय सोपी असून दीर्घोत्तरी, लघुत्तरी व वस्तुनिष्ठ प्रश्न यात दिलेले आहेत.
अनुक्रमणिका –
युनिट १
१. हडप्पा संस्कृती
२. वैदिक काळ
३. सोळा महाजनपदे, जैन व बौद्ध धर्म
युनिट २
४. चंद्रगुप्त मौर्य
५. गुप्त साम्राज्य
६. भारतावरील मुस्लिम आक्रमणे
युनिट ३
७. शम्सुद्दीन अल्तमश, गियासुद्दीन बल्बन
८. अलाउद्दीन खिलजी
९. मोहंमद बिन तुघलक
युनिट ४
१०. भक्ती आंदोलन
११. सूफी पंथ
१२. सल्तनत काळातील स्थापत्य कला