मुंबई विद्यापीठाच्या सुधारित अभ्यासक्रमाशी सुसंगत असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, “भारतीय ज्ञान प्रणाली” शीर्षक असलेले हे पुस्तक अत्यंत काळजीपूर्वक तयार करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या भारतीय ज्ञान प्रणालीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या सर्व विषयांचा या पुस्तकात संपूर्णपणे समावेश आहे. विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान परंपरांचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आढावा घेता येईल अशा पद्धतीने अभ्यासक्रम तीन स्वतंत्र विभागांमध्ये (modules) व्यवस्थित विभागलेला आहे.
निव्वळ छापील अभ्यासक्रमापलीकडे जाऊन भारतीय संस्कृतीला समजून घेणे, कला आणि सर्जनशील मूल्यांमधील देशाचे योगदान जाणून घेणे आणि विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान परंपरेची सांगोपांग माहिती करून देणे हे या पुस्तकाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. हे पुस्तक भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंमध्ये खोलवर जाते. संस्कृतीला शतकानूशतके आकार देणाऱ्या मूलभूत तत्त्वांवर प्रकाश टाकते. या माहितीद्वारे, विद्यार्थ्यांना भारताच्या सांस्कृतिक वारशाशी दृढ संबंध निर्माण करण्यास प्रोत्साहित केले जाते. वेगाने आधुनिकीकरण होत असलेल्या या जगात या मूल्यांचे जतन आणि प्रचाराची महत्त्वाची जाणीव करून दिली जाते.
भारतीय शास्त्रीय वारशावर लक्ष केंद्रित करणे हे या पुस्तकाचे आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. हे पुस्तक विज्ञान आणि तंत्रज्ञांनाबद्दलच्या अनेक प्राचीन भारतीय विद्वान आणि विचारवंतांच्या विविध वैज्ञानिक क्षेत्रातील योगदानावर (गणित, खगोलशास्त्र, औषधशास्त्र आणि अभियांत्रिकी आणि अन्य) प्रकाश टाकते. हे पुस्तक प्राचीन भारतीय ज्ञान आणि आधुनिक वैज्ञानिक प्रगती यांच्यातील संबंध दर्शवते, पारंपारिक ज्ञान समकालीन विज्ञान आणि तंत्रज्ञानावर कसे प्रभाव टाकत राहते हे स्पष्ट करते. हा दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या विज्ञानाबद्दलच्या माहितीला समृद्ध करतोच, परंतु भारताच्या बौद्धिक वारशाचा अभिमान देखील जागृत करतो.
भारतीय परंपरा आणि ज्ञान प्रणालीवर लक्ष केंद्रित करणे हे या पुस्तकाचे आणखीन एक महत्त्वाचे अंग आहे. भारतीय समाजाचा अविभाज्य भाग असलेल्या विविध विचारधारा, तात्त्विक शिकवणी आणि अध्यात्मिक पद्धतींचा तपशीलवार अभ्यास या पुस्तकाद्वारे करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आयुर्वेद, योग, वेदांत आणि भारतीय जीवन पद्धतीला आकार देणाऱ्या इतर तात्त्विक प्रणाली यांच्या समृद्धतेचा परिचय करून दिला जातो. या परंपरांचा अभ्यास करून, विद्यार्थ्यांना विज्ञान, तत्त्वज्ञान, कला आणि अध्यात्म यांचा एकसंघ आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन प्राप्त करून देणाऱ्या भारतीय ज्ञान परंपरेची सर्वंकष माहिती प्राप्त होते.
अनुक्रमणिका –
विभाग १
१. भारतीय ज्ञान प्रणाली : परिचय
विभाग २
२.१ भारतीय ज्ञान प्रणाली आणि औषधशास्त्र (आयुर्वेद)
२.२ भारतीय ज्ञान प्रणाली (IKS) आणि रसशास्त्र – अलकेमी (Alchemy)
२.३ भारतीय ज्ञान प्रणाली आणि गणित: परंपरा आणि अचूकतेचा संगम
२.४ भारतीय ज्ञान प्रणाली आणि तर्कशास्त्र
२.५ भारतीय ज्ञान प्रणाली आणि शासनकला: (शासनकला – परिचय, शासन इतिहास, चाणक्य (कौटिल्य) आणि शासनकला, कौटिलीय राज्याची वैशिष्ट्ये, चाणक्यद्वारे वर्णित राज्याचे घटक)
विभाग ३
३.१ भारतीय ज्ञान प्रणाली आणि सौंदर्यशास्त्र (रसशास्त्र)
३.२ भारतीय ज्ञान प्रणाली आणि प्राचीन भारतीय वास्तुशास्त्र आणि नगररचना
३.३ भारतीय ज्ञान प्रणाली आणि सामरिक अध्ययन
३.४ भारतीय ज्ञान प्रणाली आणि कृषी विद्या
३.५ भारतीय ज्ञान प्रणाली आणि व्याकरण व शब्दकोष: भाषा आणि शब्द निर्माणाची शास्त्र
३.६ भारतीय ज्ञान प्रणाली आणि नाट्यशास्त्र: भारतीय संस्कृतीक कलांचा पाया
३.७ भारतीय ज्ञान प्रणाली आणि प्राचीन खेळ
३.८ भारतीय ज्ञान प्रणाली आणि खगोलशास्त्र: प्राचीन आकाशीय ज्ञानाचे विज्ञान
३.९ भारतीय ज्ञान प्रणाली आणि योग: समग्र कल्याणाचा मार्ग
३.१० भारतीय ज्ञान प्रणाली आणि भाषाशास्त्र: भाषा, ज्ञान, आणि संस्कृतीचा अभ्यास
३.११ भारतीय ज्ञान प्रणाली आणि चित्रसूत्र: प्राचीन कला आणि सौंदर्यशास्त्र
३.१२ भारतीय ज्ञान प्रणाली आणि वास्तुविद्या: परंपरा, विज्ञान, आणि अध्यात्माचा समन्वय
३.१३ भारतीय ज्ञान प्रणाली आणि कर प्रणाली
३.१४ भारतीय ज्ञान प्रणाली आणि बँकिंग
३.१५ भारतीय ज्ञान प्रणाली आणि व्यापार व वाणिज्य