मुंबई विद्यापीठाने अलीकडेच बी.एड. चा अभ्यासक्रम बदलला आहे. मराठी विषयाचे ‘मराठी अध्यापन पद्धती’ हे पुस्तक आपल्या हाती देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. मुंबई विद्यापीठाची संलग्नित अभ्यासक्रमाला धरून लिहिलेले आहे.
मराठी विषयाचे अध्यापन करताना या मूल्यांशी आणि संस्कारांशी अत्यंत सूक्ष्मपणे दखल घ्यावी व ते रुजविण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा.
गेली 32 वर्षे मी मराठी अध्यापन पद्धती या विषयाचे अध्यापन मुंबईच्या अध्यापक महाविद्यालयात करीत आहे. शिक्षण-स्नातक पदवी परीक्षेकरिता मराठी अध्यापन पद्धती या विषयाकरिता हे पुस्तक उपयोगी पडावे. छात्राध्यापकांना अभ्यासक्रमानुसार लिखित पाठ्य भाग उपलब्ध व्हावा या हेतूने प्रस्तुत पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. शिक्षक मित्र-मैत्रिणींनाही पुस्तक उपयोगी पडावे अशी आशा आहे.
ह्या पुस्तकात पाठ टाचण्यांचे विविध प्रकार समाविष्ट केले आहे. उदा:-
१. सहशिक्षण
२. अनुभवात्मक शिक्षण
३. ज्ञानरचनावादी पद्धत
४. भूमिका अभिनय
५. खेळ
६. संगणक सहाय्य सूचना
७. गद्य पाठ (३५ मिनिटे)
८. पद्य पाठ
९. व्याकरण
१०. कथावस्तु आधारित पाठ
११. संकल्पना प्राप्ती प्रतिमान
असे विविध पाठ टाचणाचे नमुने दिले आहेत त्यासोबत मुंबई युनिव्हर्सिटीच्या मराठी अध्यापनाचे पेपर्स (उपलब्ध) जोडले आहेत. बी.एड. विद्यार्थ्यांना ह्या पुस्तकाचा लाभ व्हावा हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पुस्तकाचे लिखाण केले आहे.
अनुक्रमणिका –
मॉडेल १: मराठी अध्यापनासाठी आवश्यक घटक आणि अभ्यासक्रम आंतरक्रिया
१. शैक्षणिक विद्याशाखेचे मूलभूत घटक
२. मराठी भाषेचे स्वरूप, महत्त्व व सद्यस्थिती
३. मराठी भाषा अध्यापनाची उद्दिष्टे
मॉडेल २: मराठी भाषा अध्यापन पद्धती, शिक्षक व्यवसाय वृद्धी व आधुनिक दृष्टिकोन
४. भाषा अध्ययन, अध्यापनाची तंत्रे व साधनांचा वापर व महत्व
५. मराठी भाषा शिक्षकाची व्यवसाय वृद्धी
६. मराठी अध्ययन-अध्यापन विषयक उद्दिष्टे आधुनिक दृष्टिकोन
संदर्भ साहित्य सूची
प्रश्नपत्रिका
Your review is awaiting approval
Its like you read my mind! You sseem to know so much about this, like you wrote the book in iit oor something.
I think that you could do with a few pics to drive the message home a little bit, but other than that,
ths is great blog. A fantastic read. I’ll definitely be back. https://Www.waste-ndc.pro/community/profile/tressa79906983/