भारताचा भूगोल हे पाठयपुस्तक विधार्थी आणि प्राध्यापक बंधुंच्या हाती सूपूर्द करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे . सावित्रिबाई फुले पुणे विधापीठाच्या जून २०२१ पासुनच्या तृतीय वर्ष कला पेपर क्रमांक एस -३, सेमेस्टर -५ साठी, नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिलेले हे पुस्तक असेल तरी, महाराष्ट्रातील विविध विधापीठातील प्राध्यापक व बी . ए . च्या विध्यार्थाना उपयुक्त ठरेल याचा विचार करून सदर लिखाण करण्यात आलेले आहे. भूगोल विषयाची बांधिलकी, अध्ययन व अध्यापनाच्या प्रादीर्घ अनुभव , तज्ञ तसेच अनुभवी व्यक्तींशी चर्चा-संवाद , चालू घडामोडी व मुळ संदर्भ ग्रंथांच्या आधारे हे पुस्तक लिहलेले आहे.
भारताचे स्थान व विस्तार, प्राकृतिक रचना, जलप्रणाली, हवामान, मृदा व नैसर्गिक वनस्पती यांचे सुलभ आकलन व्हावे यासाठी विषयाची मांडणी सुटसुटीत व मुद्देसूद करून विविध सारणी, आकृत्या, नकाशे, छायाचित्रे व उद्धरणांचं वापर केलेला आहे. शिवाय नवीन जम्मू व काश्मीर आणि लढाख या केंद्रशाशीत प्रदेशांचा नकाशा व माहिती या पुस्तकात दिलेली आहे. या पुस्तकाचे प्रमुख वैशीटये म्ह्णजे प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी बहुपर्यायी प्रश्न व त्यांची उत्तरे दिलेली आहेत. याचा उपयोग सघस्थितीत विधार्थी व प्राध्यापक मित्रांना निश्चितच उपयुक्त ठरेल. सदरचे पुस्तक स्पर्धात्मक परीक्षा विशेषतः नेट /सेट परिक्षांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल असाही प्रयत्न केलेला आहे. प्राध्यापक मित्र, अभ्यासक व विध्यार्थीनीं या पुस्तकात सुधारणा करण्याच्या दृष्टीने काही सूचना केल्यास, त्यांचे स्वागत केले जाईल व पुढील आवृत्तीत निश्चितपणे यथायोग्य बदल केले जातील.
अनुक्रमणिका
युनिट १ : भारत: परिचय
युनिट २ : भारताची प्राकृतिक रचना
युनिट ३ : जलप्रणाली
युनिट ४ : हवामान, मृदा व नैसर्गिक वनस्पती
संदर्भ ग्रंथसूची