‘पर्यावरण भूगोल – १’ हे पाठ्यपुस्तक विद्यार्थी आणि प्राध्यापक बंधूंच्या हाती सुपूर्द करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जून २०२० पासूनच्या व्दितीय वर्ष कला, पेपर क्रमांक-२, सेमिस्टर-३ साठी, नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिलेले हे पुस्तक असले तरी, महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील प्राध्यापक व बी.ए. च्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल याचा विचार करून सादर लिखाण करण्यात आलेले आहे.
भूगोल विषयाची बांधिलकी, अध्ययन व अध्यापनाच्या प्रदीर्घ अनुभव, तज्ञ तसेच अनुभवी व्यकितींशी चर्चा-संवाद, चालू घडामोडी व मूळ संदर्भ ग्रंथांच्या आधारे हे पुस्तक लिहिलेले आहे. पर्यावरण भूगोलातील पर्यावरणाचे महत्व, अभ्यास पद्धती, परिसंस्था, जैवविविधता, पर्यावरण प्रदूषण हे घटक तसेच उपघटकांचे सुलभ आकलन व्हावे यासाठी विषयाची मांडणी सुटसुटीत व मुद्देसूद करून विविध सारणी, आकृत्या, नकाशे, छायाचित्रे व उदाहरणांचा वापर केलेला आहे. या पुस्तकाचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी बहुपर्यायी प्रश्न व त्यांची उत्तरे दिलेली आहेत. याचा उपयोग सद्यस्थितीत विद्यार्थी व प्राध्यापक मित्रांना निश्चितच उपयुक्त ठरेल. सदरचे पुस्तक स्पर्धात्मक परीक्षा विशेषतः नेट/सेट परीक्षांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल असाही प्रयत्न केलेला आहे. प्राध्यापक मित्र, अभ्यासक व विद्यार्थ्यांनी या पुस्तकात सुधारणा करण्याच्या दृष्टीने काही सूचना केल्यास, त्यांचे स्वागतच केले जाईल व पुढील आवृत्तीत निश्चितीपणे यथायोग्य बदल केले जातील.
Contents –
१. पर्यावरण भूगोल परिचय
२. परिसंस्था
३. जैवविविधता आणि तिचे संवर्धन
४. पर्यावरण प्रदूषण